बीड: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता चौथी) परीक्षेत च

बीड: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता चौथी) परीक्षेत चि. सार्थ अशोक सवासे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शिष्यवृत्तीस पात्र होण्याचा मान मिळवला आहे.
सार्थच्या या यशामागे त्याची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि गुणवत्तापूर्ण तयारी हे महत्त्वाचे घटक ठरले. त्यांच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक, मार्गदर्शक तसेच नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सार्थ यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पुढील शैक्षणिक वाटचालीतही सार्थने अशीच यशस्वी भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा सर्वांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

COMMENTS