Homeमहाराष्ट्र

“मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या अन् गंजलेले चाकू”; एफडीएचा दावा हायकोर्टाने ठरवला हास्यास्पद, अहवाल सादर होणार!

मुंबई: मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला होता. या दाव्य

पिंपळगाव फाट्यावर मटका व जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धडक छापा; १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
E-20 इथेनॉलच्या डीपफेक व्हिडिओविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उच्च न्यायालयात धाव
विद्यार्थ्यांवरील कथित हल्ल्याचा निषेधार्थ शेवगाव कडकडीत बंद; जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध पक्ष-संघटना रस्त्यावर
High Court Questioned Tukaram Mundhe FDA How Many Raid on Government  Offices Canteen | High Court on FDA : एफडीएने किती राजकीय नेत्यांच्या  आस्थापनांवर धाडी टाकल्या? मुंबई उच्च ...

मुंबई: मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला होता. या दाव्यावर “मंत्रालयाच्या कँटीनमध्ये कीटक नाही म्हणणे हास्यास्पद आहे,” असे ताशेरे ओढत मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रालयाची कँटीन प्रत्यक्ष तपासण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त तपासणीत कँटीनमध्ये माश्यांचा सुळसुळाट आणि अत्यंत अस्वच्छता आढळून आली आहे.

कोर्टाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या तपासणीदरम्यान मंत्रालयातील दोन्ही कँटीनमध्ये माश्या आढळून आल्या. तसेच भाज्या कापण्यासाठी आणि इतर कामांसाठी वापरण्यात येणारे चाकू अत्यंत जुनाट, अस्वच्छ आणि गंजलेल्या अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या धक्कादायक वास्तवामुळे एफडीएच्या निष्काळजीपणावर आणि पूर्वीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, कँटीनची प्रत्यक्ष पाहणी पूर्ण झाली असून या तपासणीचा सविस्तर अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांच्यासमोर या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे. एफडीएच्या फोल ठरलेल्या दाव्यानंतर आणि कँटीनमधील अस्वच्छतेचा अहवाल समोर आल्यानंतर आता यावर मुंबई उच्च न्यायालय काय कठोर निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS