Homeताज्या बातम्या

नांदेडमध्ये डॉक्टरच्या घरातून ८ लाखांची घरफोडी; इतवारा पोलिसांनी अवघ्या काही तासांत ५ आरोपींना ठोकल्या बेड्या

नांदेड: नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदीना नगर, देगलूर नाका परिसरातील एका डॉक्टरच्या घरातून ८ लाख १२ हजार रुपयांची रोख रक्कम च

पंढरीच्या वारीत ‘के. जे. सोमैया’च्या स्वयंसेवकांचा उल्लेखनीय सहभाग; कोपरगाव महाविद्यालयात सन्मान
गणेश ढाकणे यांची औषध निरीक्षकपदी निवड! ११ वर्षांचे कठोर परिश्रम अन् जिद्दीला यश
मोहरम निमित्त शहरात विद्यार्थ्यांना वह्या वाटप; शफी हज टुर्स आणि सामाजिक संस्थांचा पुढाकार
Burglary Case : नांदेडात आठ लाखांची घडफोडी करणारे पाच जण गजाआड

नांदेड: नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदीना नगर, देगलूर नाका परिसरातील एका डॉक्टरच्या घरातून ८ लाख १२ हजार रुपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल होताच इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जलद कारवाई करत सर्वच्या सर्व पाच आरोपींना गजाआड केले आहे.

फिर्यादी डॉ. शेख शहबाज शेख जाफर यांनी त्यांच्या वैद्यकीय व्यवसायातून आणि अपघात विम्यातून मिळालेली ८ लाख १२ हजार रुपयांची रोकड एका बॅगेत भरून पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवली होती. २४ जुलै २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून ही सर्व रक्कम चोरून नेली होती. या घटनेनंतर २९ जुलै रोजी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे व त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत पिराजी वाघमारे, सुनील रपणवाड, सुनील वाघमारे, साहेबराव वाघमारे आणि तनुष्क मेटकर (सर्व रा. चिखलवाडी व मित्र नगर, नांदेड) या पाच मजुरांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत चोरलेली १०० टक्के रक्कम (८ लाख १२ हजार रुपये) पुन्हा हस्तगत केली आहे. अवघ्या काही तासांत गुन्हा उघडकीस आणून १०० टक्के मुद्देमाल जप्त केल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी इतवारा पोलीस पथकाचे विशेष कौतुक केले आहे.

COMMENTS