Homeताज्या बातम्या

पाटेगाव सोसायटीच्या नवीन इमारतीचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन; सहकार मजबूत करण्याचे आवाहन

कर्जत: शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि जलद सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पाटेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नव्या प्रशासकी

विहिरीत पडलेल्या बिबट्यामुळे वांजुळपोई परिसरात भीतीचे वातावरण; वनविभागाच्या संथ कारभारावर शेतकऱ्यांचा तीव्र संताप
ड्रग्सच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देणारा पोलिस अखेर निलंबित! मुंबई पोलिसांची कारवाई, राजकीय वातावरण तापले
श्रीगोंद्यातील प्रा. चेतन दिवाण यांची महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणावर सदस्य म्हणून नियुक्ती

कर्जत: शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि जलद सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पाटेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संस्थेच्या भविष्यातील विकासासाठी सर्व संचालकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना प्रा. राम शिंदे म्हणाले की, सहकार क्षेत्र मजबूत झाले तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ मिळते. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकारी संस्थांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असून, विकासकामे करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि संस्थांच्या पाठीशी नागरिकांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. महायुती सरकार शेतकरी हिताच्या योजना प्रभावीपणे राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व संचालकांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. संस्थेच्या प्रगतीसाठी पदाधिकारी, संचालक आणि सभासद यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

या कार्यक्रमास ॲड. कैलास शेवाळे, अंबादास पिसाळ, बाळासाहेब सालुंखे, काकासाहेब तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राजेंद्र फाळके, ॲड. हर्षद शेवाळे, लहू तवारे, संग्राम पाटील, शांतिलाल कोपनर, राजेंद्र गुंड, ॲड. शिवाजी अनभुळे, अनिल गदादे, अशोक खेडकर यांच्यासह जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी बाळासाहेब रसाळ, सचिव सतीश शेलार, संचालक युवराज लाड, नवनाथ डुकरे, रावसाहेब रोकडे, रत्न भंडारे, दत्ता जाधव, परशुराम लाड, बंडू इरकर, भाऊसाहेब भिल्लारे, आशाबाई लाड, लक्ष्मण महारनवर आदी प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. हर्षद शेवाळे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS