Homeताज्या बातम्या

पावसाळ्यातील संभाव्य आजार टाळण्यासाठी उपाययोजना करा; आमदार आशुतोष काळेंचे आरोग्य विभागाला निर्देश

कोपरगाव: पावसाळ्यातील संभाव्य आजारांचा प्रसार वाढल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी पुढे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज घेऊन आधीच प्रतिबंधक

इराणचा अमेरिकेवर बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ल्याचा आरोप; अमेरिका-इराण तणावामुळे जगाचे टेन्शन वाढले
स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांची दमदार कामगिरी! जबरी चोरी, घरफोडी, सोलार प्लांटवर चोरी करणारी टोळी केली जेरबंद
गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन

कोपरगाव: पावसाळ्यातील संभाव्य आजारांचा प्रसार वाढल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी पुढे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज घेऊन आधीच प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरात कुठेही डासांची पैदास होणार नाही याची दक्षता घेऊन आरोग्य विभागाने पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी दिले आहेत.

मंगळवार (दि. २८) रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव एकात्म आरोग्य वर्धिनी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ तळागाळातील रुग्णांपर्यंत पोहोचवणे, ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करून रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवणे, तसेच रुग्णालयातील आरोग्य सेवा व मिळणाऱ्या उपचारांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार काळे म्हणाले की, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मागील पाच वर्षांत कोपरगाव तालुक्यात आरोग्य विभागासाठी जेवढी कामे मंजूर करून आणली, तितकी कामे यापूर्वी कधीही झाली नव्हती. सध्या कोपरगाव शहरात १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम वेगाने सुरू असून माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले आहे. याशिवाय संवत्सर येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून, तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र कोकमठाण येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे.

या बैठकीस तहसीलदार महेश सावंत, गट विकास अधिकारी स्वप्नील वाळूंज, संदीप दळवी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. गिरीश गुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप यांच्यासह एकात्म आरोग्य वर्धिनी समितीचे सदस्य उपस्थित होते.

COMMENTS