खरवंडी कासार: पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी गावचे सुपुत्र गणेश त्रिंबक ढाकणे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) 'औषध निरीक्षक' (Food and

खरवंडी कासार: पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी गावचे सुपुत्र गणेश त्रिंबक ढाकणे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ‘औषध निरीक्षक’ (Food and Drug Administration) पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे भालगावसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गणेश ढाकणे यांनी मागील तब्बल ११ वर्षे एमपीएससी स्पर्धा परीक्षेची सातत्यपूर्ण तयारी केली. या संघर्षाच्या काळात त्यांनी तब्बल सात वर्षे वैद्यकीय दुकानात फार्मासिस्ट म्हणून नोकरी करत अभ्यास आणि काम यांचा उत्कृष्ट समतोल साधला. अनेक कौटुंबिक व आर्थिक अडचणींवर मात करत, कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी अखेर हे यश संपादन केले.
त्यांच्या या यशामुळे भालगाव परिसरासह संपूर्ण पाथर्डी तालुक्याचा गौरव वाढला असून, ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी त्यांचा हा संघर्षमय प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
गणेश ढाकणे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या भावी वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या जात आहेत.

COMMENTS