Homeताज्या बातम्या

मनसे विद्यार्थी सेनेच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी ओम खेडकर यांची नियुक्ती; शासकीय विश्रामगृहात उत्साहात बैठक

खरवंडी कासार: पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची बैठक विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा तथा मन

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लायन्स मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना भोजनदान; कोपरगाव शिवसेनेचा सामाजिक उपक्रम
लोणी व्यंकनाथ येथे शेततळ्यात पडून दोन चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू; रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याचा आरोप
एखाद्या अभ्यासू चिकित्सकाने एसआयआर प्रक्रियेवर पीएचडी करावी; नागरिकांची त्रस्त अवस्था बघून मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांचे आवाहन

खरवंडी कासार: पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची बैठक विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा तथा मनसे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीस पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील असंख्य विद्यार्थी सैनिक व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी ओम देविदास खेडकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करून पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. ओम खेडकर यांच्या या निवडीबद्दल शहर जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, कर्जत तालुकाध्यक्ष सचिन सटाले, प्रल्हाद कीर्तने, शहादेव खेडकर व देविदास खेडकर यांनी सुरुवातीला अभिनंदन केले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे लढा उभारण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

याप्रसंगी मनसे तालुका उपाध्यक्ष अशोकराव आंधळे, लक्ष्मण डांगे यांच्यासह शेवगाव मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अजिंक्य अंधारे, सचिन फुंदे, अंगद फुंदे, ओंकार फुंदे, कैलास फुंदे, अजय फुंदे, मुकुंद फुंदे, निशांत फुंदे, शुभम फुंदे, अमर फुंदे, कानिफ खेडकर, स्वराज खेडकर, अशोक खामकर, प्रतीक रांधवणे, अजिंक्य अंदुरे, सोमनाथ घुले, अंबादास ढाकणे, प्रदीप जगताप, अक्षय फुंदे, देविदास साबळे, प्रवीण घुले, विश्वास साबळे, उमेश शिरसाठ, गोविंद गर्जे आणि सचिन पंडित यांच्यासह पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

COMMENTS