नवी दिल्ली: देशभरात पावसाचा जोर कायम असून उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग, चमोली आणि उत्तरकाशी या तीन जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सकाळी भूस्खलन झाले. गौरीक

नवी दिल्ली: देशभरात पावसाचा जोर कायम असून उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग, चमोली आणि उत्तरकाशी या तीन जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सकाळी भूस्खलन झाले. गौरीकुंडजवळ झालेल्या भूस्खलनामुळे केदारनाथ ट्रेकिंग मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला असून, प्रवासाला निघालेल्या भाविकांना सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले आहे.
दुसरीकडे, हरिद्वार येथे गंगेच्या वेगवान प्रवाहात गंगाजल भरताना एक तरुण वाहुन जाऊ लागला होता. घाटावर ड्युटीवर असलेल्या एसडीआरएफ (SDRF) टीमच्या जवानांनी तात्काळ तत्परता दाखवत त्याला सुखरूप बाहेर काढले.
तसेच, रुद्रप्रयाग येथील सिल्लीजवळ भराव आणि ढिगारा आल्याने महामार्ग काही काळ बाधित झाला होता. तर एका पेट्रोल पंपाजवळ डोंगरावरून मोठे दगड आणि दरड कोसळल्याने खाली उभी असलेली एक कार दबली गेली. परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना व भाविकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS