Homeताज्या बातम्या

अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा गळा दाबून खून; पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून फेकला, पती-पत्नीला अटक

पुणे: पुण्यातील शिक्रापूर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा त्याच्याच सोबत राहण

बालदिंडीने वांबोरी स्टेशन परिसर भक्तिमय; जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम उत्साहात संपन्न
नीट पेपर लीकप्रकरणी बिहार बंद दरम्यान हिंसाचार; सीवानमध्ये दगडफेकीत एसपी जखमी, तेजप्रताप यादव पोलिसांच्या ताब्यात
रमाई घरकुलाच्या लाभार्थ्यांचे ३० कोटी रुपये ६ महिन्यांपासून रखडले; समाज कल्याण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Pune Crime : अनैतिक संबंधांच्या संशयातून 'खून', 'टॅटू'ने उलगडले गूढ!  मारेकरी २४ तासांत जेरबंद; भिगवण हादरले

पुणे: पुण्यातील शिक्रापूर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा त्याच्याच सोबत राहणाऱ्या रूममेटने गळा दाबून निर्घृण खून केला. इतकेच नव्हे तर, हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने आपल्या पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून निर्जन झुडपात फेकून दिला. शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या काही तासांत या हत्याकांडाचा उलगडा केला असून आरोपी पती-पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी काय आहे घटना?

ही थरारक घटना २४ ते २६ जुलै दरम्यान करंजेनगर येथे घडली. गौरव उर्फ अक्षय अशोक वायकर (वय २४, मूळ रा. थेऊर, ता. हवेली) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. २६ जुलै रोजी दुपारी करंजेनगर येथील एका मोकळ्या मैदानावरील झुडपात पोत्यात भरलेला एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली. मृतदेहाची ओळख पटवणे सुरुवातीला कठीण होते; मात्र शिक्रापूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे हलवत सोशल मीडियावर छायाचित्रे प्रसारित केली आणि गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. त्यावरून मृत तरुण हा गौरव वायकर असल्याचे निष्पन्न झाले.

असा उलगडला हत्येचा बनाव

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, गौरव हा करंजेनगर येथे मुकेश विठ्ठल सोनवणे (वय १९) आणि त्याची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय १९) यांच्यासोबत एकाच रूममध्ये राहत होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यात जोरदार वाद सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ संशयित मुकेश आणि जान्हवी या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक संबंधाच्या संशयातून आरोपी मुकेशने गौरवचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा लपवण्यासाठी त्याची पत्नी जान्हवी हिने मृतदेह पोत्यात भरण्यास व तो झुडपात नेऊन फेकण्यास मदत केली असल्याचे निष्पन्न झाले.

दोन्ही आरोपींना अटक

याप्रकरणी मृत गौरवची आई कांचन अशोक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत दोन्ही आरोपींना (मुकेश सोनवणे आणि जान्हवी पाटोळे) अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

COMMENTS