खरवंडी कासार: पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी गावाचे सुपुत्र गणेश त्रिंबक ढाकणे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspe

खरवंडी कासार: पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी गावाचे सुपुत्र गणेश त्रिंबक ढाकणे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) पदावर निवड झाली आहे. या दैदिप्यमान यशामुळे भालगावसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गणेश ढाकणे यांनी मागील तब्बल ११ वर्षे एमपीएससी स्पर्धा परीक्षेची सातत्यपूर्ण तयारी केली. या काळात त्यांनी सात वर्षे वैद्यकीय दुकानात फार्मासिस्ट म्हणून कार्य करत नोकरी आणि अभ्यास यांचा उत्कृष्ट समतोल साधला. अनेक अडचणींवर मात करत कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.
त्यांच्या या यशामुळे भालगाव परिसरासह पाथर्डी तालुक्याचा गौरव वाढला असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांसाठी त्यांचा हा संघर्षमय प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
गणेश ढाकणे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

COMMENTS