Homeताज्या बातम्या

कोयना धरणाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण; महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

अहिल्यानगर: पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहास

लोकमंथन इफेक्ट : उघड्या विहिरीला बांधले संरक्षण कठडे; घारगाव-पिंपळगाव पिसा रस्त्यावरील संभाव्य धोका टळला
किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय नाट्य! अविश्वास प्रस्तावाला उच्च न्यायालयाची स्थगिती मिळताच १४ संचालकांचे सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र?
कोपरगावात दोन दिवसीय मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वाटप शिबिराचे आयोजन; आमदार आशुतोष काळे यांची माहिती

अहिल्यानगर: पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर” असे नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

कोयना जलसागरास यापूर्वी ‘शिवाजी जलसागर’ या नावाने संबोधले जात होते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख योग्य नसल्याने नावामध्ये बदल करून छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण आणि आदरातिथ्ययुक्त नाव या कोयना जलाशयाला देण्यात यावे, अशी मागणी शिवप्रेमी नागरिकांकडून सातत्याने होत होती.

जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत विशेष पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या जलाशयाचे नामांतर करण्याबाबत विनंती केली होती.

महायुती सरकारने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करून कोयना जलसागराचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केल्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. जलसागराचे नामांतर करण्याची शिवप्रेमी नागरिकांची प्रदीर्घ मागणी आणि जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून निर्णय घेतल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले आहेत.

COMMENTS