Homeताज्या बातम्या

कर्नाटकात आढळले 7000 विद्यार्थी एचआयव्ही बाधितसरकारकडून महाविद्यालयांत नियमित तपासणी व जनजागृती

https://youtu.be/Wh-LRDeVHhQ कर्नाटकात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही संसर्गाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील सुमारे ७ हजा

गेमिंग प्लॅटफॉर्म गेम्सक्राफ्टच्यातीन संस्थापकांना ईडीने केली अटक
‘हात-पाय तोडले तरच लोकांना कायद्याचा धाक बसेल’; कर्नाटक उच्च न्यायालयाची टिप्पणी
कर्नाटकात खातेवाटपावरून सरकारला धक्कामंत्रीपदाचा राजीनामा देत रामलिंगा रेड्डींची नाराजी उघड

कर्नाटकात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही संसर्गाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील सुमारे ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी महाविद्यालयांमध्ये नियमित एचआयव्ही तपासणी, समुपदेशन आणि जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, तरुणांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत असून विद्यार्थ्यांना एचआयव्हीची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, सुरक्षित वर्तन आणि उपचार याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या माहितीनुसार, एचआयव्ही बाधितांच्या संख्येत कर्नाटक देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात सध्या सुमारे २ लाख ६० हजार नागरिक एचआयव्हीसह जीवन जगत आहेत.विशेष म्हणजे १८ ते २५ वर्षे वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संसर्गाची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळे तपासणीसोबतच विद्यार्थ्यांना गोपनीय समुपदेशन आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.एचआयव्हीबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष जनजागृती मोहीमही राबवली जाणार आहे.

COMMENTS