Homeताज्या बातम्या

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती बैठक संपन्नयुवक-युवतींनी जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी करावी-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

बीड : जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धेत सहभाग नोंदवून भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी तरुणांना उपलब्

विश्वकर्मा परिवारातर्फे रविवारी शिर्डीत पुरस्कार वितरण; समाजरत्न आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
ओबीसी विकासासाठी शासनाचा ठोस रोडमॅप; नांदेडमध्ये कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळावा उत्साहात
युवकांनी समाजविकासत योगदान द्यावे : चिंतामणी  
NashikSkill | Nashik


बीड : जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धेत सहभाग नोंदवून भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी तरुणांना उपलब्ध झाली आहे. यासाठी इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 च्या अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील पात्र व इच्छुक युवक-युवतींनी मोठ्या संख्येने नोंदणी करून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी शिला मिसाळ, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त  आर.डी.कटक यांच्यासह संबंधित कार्यकारी समितीचे सदस्य उपस्थित होते. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे उमेदवार राष्ट्रीय प्रक्रियेतून पुढे जाऊन जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करू शकतील.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा हा मुख्य निकष आहे. 56 विविध कौशल्य क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2003 किंवा त्यानंतरचा असावा. तसेच सायबर सिक्युरिटी, इंडस्ट्री 4.0 आणि मेकाट्रॉनिक्स यांसारख्या टीम स्किल्ससाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2003 नंतरचा, तर स्वायत्त मोबाईल रोबोटिक्स आणि लँडस्केप गार्डनिंगसाठी 1 जानेवारी 2006 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. सर्व शासकीय व खाजगी आयटीआय, अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालये, एमएसएमई टूल रूम्स आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील पात्र तरुणांनी इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 करीता हीींिीं://ुुु.ीज्ञळश्रश्रळपवळरवळसळींरश्र.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर नोंदणी करुन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.  असेही त्यांनी सांगितले. बैठकीत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त  आर.डी.कटक यांनी बीड जिल्ह्याच्या कौशल्य विकास आराखडा 2026-27 आराखडा सादर केला. या प्रारुप आरखड्यामध्ये 25 सेक्टरमधील 119 अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2026-27  अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कोर्सचीं निवड करुन प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी सादर करणे यासाह इंडिया स्कील्स कॉम्पिटीशन 2026-27 बाबत समितीला सविस्तर माहिती दिली.

COMMENTS