Homeताज्या बातम्या

जिल्हा बँकेच्या रणांगणात आज निकालाचा थरार; प्रस्थापित धक्का की पुन्हा वर्चस्व?

नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होत असून, सहकारासोबतच जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरह

महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक संतप्त; वारा-पाऊस नसतानाही हणेगाव मध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स; महसूल मंत्री बावनकुळे यांचे कठोर कारवाईचे संकेत
विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड शहरातील प्रमुख बाजारपेठा कडकडीत बंद; हजारो विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होत असून, सहकारासोबतच जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही या निकालाचा दूरगामी परिणाम होणार आहे. जवळपास ९६ टक्के मतदान झाल्यामुळे मतदारांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला असून, अनेक मतदारसंघांतील निकालाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या निवडणुकीत ११ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १२ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. काही मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले, तर काही ठिकाणी अपेक्षांपेक्षा कमी मतदान झाल्याने विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. मतदानाच्या टक्केवारीवरूनच अनेक नेत्यांनी जय-पराजयाचे अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी अंतर्गत नाराजी, स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि कार्यकर्त्यांमधील मतभेद चर्चेचा विषय ठरले. विशेषतः नांदेड आणि देगलूर तालुक्यांमध्ये अधिकृत उमेदवारांबाबत मतदारांमध्ये मिश्र प्रतिक्रिया असल्याची चर्चा शेवटच्या टप्प्यापर्यंत कायम राहिली. त्यामुळे या दोन मतदारसंघांत प्रस्थापित गणिताला धक्का बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रचाराच्या काळात अनेक नेत्यांनी आपापल्या ताकदीची चाचणी केली. काही ठिकाणी उघड पाठिंबा, तर काही ठिकाणी शांतपणे झालेल्या राजकीय हालचाली मतदानावर परिणामकारक ठरल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे मतमोजणीत अनपेक्षित निकाल समोर आल्यास त्याचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातील राजकारणावर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, लेबर कॉलनी येथील ललित कला भवनात मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, कडक पोलीस बंदोबस्तात सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर जिल्हा बँकेच्या सत्तेवर कोणाचा प्रभाव राहणार याचा निर्णय होईल. निकालानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठीही राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे संकेत आहेत.

COMMENTS