Homeताज्या बातम्या

पंजाबमध्ये मोठी खळबळ; संगरूर येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला!

संगरूर: सध्या देशभरात पेपर लीकच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. दोनच दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा रा

नांदेड जिल्ह्यातील १२२ रास्तभाव दुकानांच्या परवान्यांसाठी अर्जास १२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
तार गोठ्यावर पडल्याने आठ गायींचा मृत्यू; देवळाली प्रवरा जवळील काळे वस्तीवरील दुर्दैवी घटना
कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील अर्ज न्यायालयाकडून नामंजूर; ॲड. राहुल सोळंके यांनी केली गैरअर्जदाराची बाजू
Maharashtra Zilla Parishad Election 2026: 11 Mahayuti Candidates Elected  Without Contest in Sindhudurg - www.lokmattimes.com

संगरूर: सध्या देशभरात पेपर लीकच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. दोनच दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले होते. संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर देशभरात वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने वातावरण थोडे शांत झाले असतानाच, आता पंजाबमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात भाजपच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र भाजप कार्यालयाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी बियरच्या बाटलीचा वापर करून पेट्रोल बॉम्ब बनवला आणि तो भाजप कार्यालयावर फेकला. ही घटना रविवारी पहाटे तीन वाजता घडल्याची माहिती समोर येत आहे. हा पेट्रोल बॉम्ब थेट भिंतीवर धडकून फुटला, ज्यानंतर भाजप कार्यालयाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS