Homeताज्या बातम्या

संस्कारच्या चिमुकल्यांनी केला विठ्ठल नामाचा जयघोष; संस्कार विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

बीड: येथील संस्कार विद्यालयातील इयत्ता पहिली व दुसरी विभागात आषाढी एकादशीनिमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६: पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध होणार! आधार प्रमाणीकरणाचे आवाहन
२६ जून रोजी वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लाठीचार्जवर ‘तातडीने’ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार! सरन्यायाधीश म्हणाले: आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ बघण्यास वेळ नाही

बीड: येथील संस्कार विद्यालयातील इयत्ता पहिली व दुसरी विभागात आषाढी एकादशीनिमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापिका श्रीमती शोभाताई कुलकर्णी, विभागप्रमुख श्रीमती विद्याताई पारगांवकर, बालाध्यक्ष कु. वेदिका बनसोडे, प्रमुख पाहुण्या कु. स्वरा राजपूत व श्रीमती प्रतीक्षा बुंदेले यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्व मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी श्रीमती व्ही. आर. पानखडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी विठुरायाच्या विविध गोष्टी, अभंग, गवळणी आणि भक्तीगीते सादर करून आपला भक्तीभाव सिद्ध केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती व्ही. व्ही. डोळस यांनी केले. या सोहळ्यास बहुसंख्येने पालक उपस्थित होते. याप्रसंगी शालेय पोषण आहार प्रमुख श्रीयुत जी. आर. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना केळीचे वाटप केले, तर श्रीमती वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी बाल वारकऱ्यांची विठ्ठल नामाच्या जयघोषात शालेय परिसरामध्ये भव्य पायी दिंडी काढण्यात आली. रिंगण सोहळा आणि फुगड्या खेळून बालसभेची सांगता करण्यात आली. या सर्व कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती ए. आर. डोईफोडे यांनी केले.

COMMENTS