Homeताज्या बातम्या

उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा; किसन तांगडे यांचे बीडमध्ये आवाहन

बीड: अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोज

श्रद्धा कपूरचा ‘इठा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नाव बदलण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
शिर्डीसाठी सव्वाचार कोटींचा निधी मंजूर; पहिल्या टप्प्यात १.३० कोटींचे वितरण, खा. वाकचौरे यांच्या पाठपुराव्यास यश
शाळेची इमारत मोडकळीस आल्याने वर्षभरापासून विद्यार्थी झाडाखाली; माजलगाव तालुक्यातील काळेगाव थडी येथील धक्कादायक प्रकार

बीड: अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या निर्देशानुसार युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. आरक्षणातील उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या आरक्षण हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत हे धोरण रद्द करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे.

रिपाइंचे बीड तालुकाध्यक्ष किसन तांगडे यांनी पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते, गायरानधारक, घरकुलधारक तसेच समाजबांधवांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन शक्ती प्रदर्शन करावे, असे आवाहन केले आहे.

यावेळी शाहू डोळस, सुभाष तांगडे, सतीश शिनगारे, भाऊसाहेब कांबळे, राजू वक्ते, राहुल कांबळे, देवानंद वाघमारे, रामेश्वर खळगे, आप्पा शेळके, भास्कर जावळे, अविनाश अवघड, बंडू ठोंबरे, विशाल इंगोले, नामदेव वाघमारे, रतन वाघमारे, भीमराव घोडेराव, विशाल गव्हाणे, मनोज ससाने, आप्पा पवार, संतोष जाधव, अजित सावंत, भैय्या वाघमारे, प्रणव पायाळ, आकाश साबळे, रवींद्र वीर, नवनाथ डोळस, समाधान गवळी, कल्याण सोनवणे, सुशील तांगडे, अमोल डावकर आदींनीही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS