बीड: देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आयटी, डेटा सायन्स, सायबर स

बीड: देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आयटी, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, व्यवस्थापन, पत्रकारिता आणि ग्रंथालय व माहितीशास्त्रातील रोजगाराभिमुख पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
पदवी स्तरावर बी.सी.ए., बी.एस्सी. डेटा सायन्स आणि बी.एस्सी. फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सिक्युरिटी हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बी.सी.ए. अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना संगणक, प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि वेब तंत्रज्ञानाचे सखोल शिक्षण दिले जाते. बी.एस्सी. डेटा सायन्स या अभ्यासक्रमात डेटा अॅनालिटिक्स, मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि बिझनेस अॅनालिटिक्सचे प्रशिक्षण दिले जाते, तर बी.एस्सी. फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सिक्युरिटीद्वारे डिजिटल फॉरेन्सिक, सायबर गुन्हे तपास, माहिती सुरक्षा आणि डिजिटल पुरावा विश्लेषणाचे ज्ञान मिळते.
पदव्युत्तर स्तरावर एम.सी.ए., एम.एम.एस., एम.ए. (मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) तसेच एम.लिब. अँड आय.एस्सी. हे अभ्यासक्रम चालवले जातात. एम.सी.ए. हा अभ्यासक्रम आधुनिक सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रगत शिक्षण देणारा आहे, तर एम.एम.एस. अभ्यासक्रमाद्वारे उद्योग, बँकिंग, वित्त, मार्केटिंग आणि मानव संसाधन क्षेत्रात नेतृत्व विकसित केले जाते. एम.ए. पत्रकारिता आणि एम.लिब. अँड आय.एस्सी. हे दोन्ही अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी खुले आहेत. पत्रकारिता, डिजिटल मीडिया, जनसंपर्क आणि कंटेंट क्रिएशन क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्यांसाठी एम.ए. पत्रकारिता हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरतो, तर एम.लिब. अँड आय.एस्सी. अभ्यासक्रमाद्वारे डिजिटल ग्रंथालय, माहिती व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतात.
बी.सी.ए. आणि एम.सी.ए. या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा’मार्फत केंद्रीकृत प्रक्रियेद्वारे होणार असल्याने, केवळ सीइटी प्रक्रियेत सहभागी झालेले विद्यार्थीच या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशास पात्र राहतील. महाविद्यालयात अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लायब्ररी, हायस्पीड वाय-फाय, अनुभवी प्राध्यापक, उद्योगभेटी, कौशल्यविकास प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन, प्लेसमेंट सहाय्य, शासनमान्य शिष्यवृत्ती, बस सेवा आणि वसतिगृहाची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन किंवा मो. ९३१०६६६६५१ वर संपर्क करून आपला प्रवेश त्वरित निश्चित करावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS