Homeताज्या बातम्या

साहित्यिक रुचिरा बेटकर यांना ‘डॉ. अण्णा भाऊ साठे गौरव पुरस्कार’; १ ऑगस्ट रोजी नांदेड येथे वितरण

नांदेड: साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय

सिद्धेश्वर घाटावर दशक्रिया विधीसाठी काकस्पर्श; नागरिकांनी परंपरेवर विश्वास ठेवावा, काकस्पर्श समितीचे आवाहन
स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांची दमदार कामगिरी! जबरी चोरी, घरफोडी, सोलार प्लांटवर चोरी करणारी टोळी केली जेरबंद
अंथरवन पिंपरी तांडा येथे कृषिदूतांनी जाणून घेतल्या शेतकर्‍यांच्या गरजा; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे दिले प्रात्यक्षिक

नांदेड: साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी नांदेड येथील साहित्यिक रुचिरा शेषराव बेटकर यांची ‘डॉ. अण्णा भाऊ साठे गौरव पुरस्कार-२०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे चौक, नांदेड येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन लहुजी साळवे युवक संघ, नांदेड आणि साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती, नांदेड यांच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आले आहे.

रुचिरा बेटकर यांच्या या निवडीबद्दल त्यांचे साहित्यिक व सामाजिक वर्तुळातून आणि विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS