Homeताज्या बातम्या

जिल्हा बँक निवडणूक : माहूरमध्ये १०० टक्के मतदान; तिन्ही मतदारसंघांतील सर्व मतदारांनी बजावला हक्क

माहूर: नांदेड जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. २६ जुलै) झालेल्या मतदानात माहूर येथील मतदान केंद्र क्रमांक १६ वर शंभ

सागवान तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय? लोहा-चेनापूर वनक्षेत्रातील कथित वृक्षतोडीने खळबळ
कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील अर्ज न्यायालयाकडून नामंजूर; ॲड. राहुल सोळंके यांनी केली गैरअर्जदाराची बाजू
नीट पेपरफुटीप्रकरणी राजधानीत आमरण उपोषण; सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात
Nanded District Bank Election: नांदेड जिल्हा बँक निवडणूक: ११ जागा बिनविरोध,  १२ जागांवर लढत

माहूर: नांदेड जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. २६ जुलै) झालेल्या मतदानात माहूर येथील मतदान केंद्र क्रमांक १६ वर शंभर टक्के मतदानाची नोंद झाली. तिन्ही मतदारसंघांतील सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला.

माहूर शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्र क्रमांक १६ वर ’अ’ मतदारसंघातील ३८ पैकी ३८, ’ब’ मतदारसंघातील १ पैकी १ आणि ’क’ मतदारसंघातील २ पैकी २ अशा एकूण ४१ पैकी ४१ मतदारांनी मतदान केले. त्यामुळे या केंद्रावर शंभर टक्के मतदानाची उल्लेखनीय नोंद झाली.

निवडणूक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक अधिकारी शाहूराज हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. केंद्राध्यक्ष एल. जी. अय्यर यांनी मतदान केंद्रावरील कामकाजाची जबाबदारी सांभाळली. त्यांना टी. के. वायबसे, व्ही. यू. राऊत, व्ही. एच. नगराळे आणि प्रेमदास चव्हाण यांनी सहकार्य केले.

मतदान प्रक्रिया अत्यंत शांततापूर्ण वातावरणात पार पडली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

COMMENTS