Homeताज्या बातम्या

देशातील तरुणांच्या विधायक कार्याचे कौतुक; ‘मन की बात’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला गौरव

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रसारित झालेल्या 'मन की बात' या मासिक संवादाच्या १३६ व्या भागातून देशवासियांशी संवाद साधताना का

आष्टीच्या डी. फार्मसी कॉलेजचा निकाल उत्कृष्ट; प्रथम वर्ष १०० टक्के तर द्वितीय वर्षाचा ९८ टक्के निकाल
महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक संतप्त; वारा-पाऊस नसतानाही हणेगाव मध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार; अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, विद्यार्थी आणि युवा पिढीच्या भविष्याविषयी  व्यक्त केलेल्या आपल्या जिव्हाळ्यासाठी आणि प्रेरणादायी संदेशासाठी मनःपूर्वक  आभार., आपली दूरदृष्टी आणि मार्गदर्शन भारताच्या युवा ...

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ या मासिक संवादाच्या १३६ व्या भागातून देशवासियांशी संवाद साधताना कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. देशातील तरुणांच्या वैज्ञानिक कामगिरीचे, स्वदेशी संशोधनाचे, अंतराळ क्षेत्रातील प्रगतीचे, जलसंधारण मोहिमांचे, पर्यावरण संवर्धनाचे आणि स्थानिक उत्पादनांच्या जतनाचे विशेष कौतुक करत त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी कारगिल विजय दिनाचा उल्लेख करत भारतीय सैनिकांच्या पराक्रमाला अभिवादन केले. अत्यंत कठीण परिस्थिती, प्रतिकूल हवामान आणि अनेक अडचणींचा सामना करून भारतीय सैन्याने शत्रूचा पराभव करत देशाचा अभिमान उंचावला, असे ते म्हणाले. कारगिल विजय हा प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कायम राहणारा इतिहास असल्याचे त्यांनी नमूद केले. यंदा दिल्ली ते द्रास अशी विशेष शौर्ययात्रा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती देताना त्यांनी स्वदेशी संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचाही उल्लेख केला. भारतीय नौदलात नव्या युद्धनौकेचा समावेश तसेच स्वदेशी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्यांमुळे देशाची संरक्षण क्षमता अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील युवकांनी विज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून भारताचा गौरव वाढवल्याचे सांगताना पंतप्रधानांनी विविध आंतरराष्ट्रीय विज्ञान स्पर्धांमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या यशाचा विशेष उल्लेख केला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांतील जागतिक विज्ञान स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले असून, हे देशातील नव्या पिढीच्या क्षमतेचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सहभागी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी देशातील क्रीडा क्षेत्रातील वाढत्या यशाचे अभिनंदन केले. जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी सातत्याने यश मिळवले असून, बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू यांच्या उल्लेखनीय कामगिरीपासून ते महिला क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयापर्यंत अनेक उपलब्धींमुळे देशाचा मान वाढल्याचे त्यांनी सांगितले.

अंतराळ क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा

पंतप्रधानांनी भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील अलीकडील यशाचा गौरव करत सांगितले की, स्वदेशी खाजगी उद्योग क्षेत्राने विकसित केलेल्या ‘विक्रम-१’ या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. एकेकाळी अशक्य वाटणारे स्वप्न आज भारतीय तरुणांनी आपल्या बुद्धिमत्ता, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर प्रत्यक्षात उतरवले आहे. या यशामुळे भारतातील खाजगी उद्योगांचा अंतराळ क्षेत्रातील सहभाग अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक थेंब म्हणजे भविष्यातील संपत्ती

जलसंधारणाबाबत बोलताना पंतप्रधानांनी ‘पाऊस जिथे पडेल तिथे पाणी अडवा’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय अभियानाचा उल्लेख केला. विविध राज्यांनी तलाव, जलसाठे आणि पाणी अडवण्याच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशात हजारो तलाव उभारण्यात आले असून, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये जलसंधारणाची व्यापक कामे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. आज वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS