Homeताज्या बातम्या

काळू धबधब्यावर दोन ट्रेकर्सचा मृत्यू; पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याने दुर्दैवी घटना

पुणे: पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील प्रसिद्ध काळू धबधबा परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या दोन ट्रेकर्सचा पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्यान

८ महिन्यांपासून वेतन रखडले; जलजीवन-स्वच्छता मिशनच्या १,१३६ कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन, ३ ऑगस्टपासून मुंबईत तीव्र लढ्याचा इशारा
कुंडलवाडीत सीसी रस्त्याच्या कामावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; व्यंकटेश्वर मंदिर ते पाण्याच्या टाकी रस्त्यावरून राजकारण तापले
शेवगावमध्ये स्मार्ट मिटर विरोधात ‘वंचित’चे ठिय्या आंदोलन; महावितरण कार्यालयासमोर निदर्शने
काळू धबधबा ट्रेक | देवाची दरी | महाराष्ट्र गडकिल्ले

पुणे: पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील प्रसिद्ध काळू धबधबा परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या दोन ट्रेकर्सचा पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रमण अण्णापुरे आणि पवन साठे अशी मृत ट्रेकर्सची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरापासून माळशेज घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काळू धबधब्यावरून मोठ्या वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू असून, धबधब्याखालील काळू नदीही दुथडी भरून वाहत आहे.

अशा गंभीर परिस्थितीत ट्रेकिंगसाठी आलेले रमण अण्णापुरे आणि पवन साठे हे दोघे पाण्याच्या प्रवाहात अडकले. पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की, दोघेही प्रवाहात वाहून गेले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

COMMENTS