बीड: अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अबकड उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर ठेवून आपल्या राजकीय फायद्यासाठी ५९ जातींमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र राज्यकर्त्

बीड: अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अबकड उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर ठेवून आपल्या राजकीय फायद्यासाठी ५९ जातींमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र राज्यकर्त्यांकडून राज्यभर राबविण्यात येत आहे. उपवर्गीकरण लागू करण्यासाठी सुरू असलेले हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरून युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाइंच्या वतीने तीव्र निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी व आरक्षणाच्या माध्यमातून ५९ जातींना मिळालेले हक्क अबाधित ठेवण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या या तीव्र आंदोलनात रिपाइं पदाधिकारी, महिला व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांनी केले आहे.
या आवाहनाला रिपाइं नेते बापू पवार, अविनाश जोगदंड, संभाजी गायकवाड, महेश आठवले, विलास जोगदंड, भैय्या मस्के, मनोज बोराडे, महेंद्र वडमारे, अॅड. सुरेश वडमारे, भैय्या साळवे, धम्मा पारवेकर, अक्षय कोकाटे, पप्पू वाघमारे, आप्पा मिसळे, गौतम कांबळे, संजय हनवते, दीपक कांबळे, दयानंद उजगरे, सोनू वडमारे, अजिंक्य वडमारे, नागेश दुबळे, शाम वीर, सनी जोगदंड, के. के. कांबळे, जितू धन्वे, गणेश वडमारे आणि सचिन वडमारे आदींनी पाठिंबा दर्शवला आहे.

COMMENTS