Homeताज्या बातम्या

वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा; भंडी शेगाव येथे हजारो वारकऱ्यांसाठी महापंगत

पंढरपूर: आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथील भंडी शेगाव परिसरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पुढाकारातून वारकऱ्यांसाठी भव्य महापंगतीचे आयोजन

देवळाली प्रवरात भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत २६ वर्षीय तरुण ठार
कर्मयोगी आबासाहेब काकडे हे देशव्यापी व्यक्तिमत्व: डॉ. पुरुषोत्तम भापकर
नांदेड शहरातील बाफनाबाफना पुलाखाली दिवसाढवळ्या खंजीराचा धाक दाखवत युवकाला लुटले; परिसरात गुन्हेगारांचा वाढता वावर चिंतेचा विषय

पंढरपूर: आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथील भंडी शेगाव परिसरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पुढाकारातून वारकऱ्यांसाठी भव्य महापंगतीचे आयोजन करण्यात आले होते. हजारो वारकऱ्यांनी या महापंगतीचा लाभ घेतला. यावेळी जयदत्त क्षीरसागर यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी त्यांनी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली.

महापंगतीनंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा आहे. विठुरायाच्या भक्तांची सेवा करण्याचे भाग्य लाभणे ही माझ्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. संत परंपरेचा वारसा जपणारी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असून सर्व वारकऱ्यांना आषाढी वारीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

या प्रसंगी ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, समाधान महाराज शर्मा, माजी मंत्री बबनराव पाचपुते, अरुण डाके, नवनाथ कुलकर्णी, महेंद्र फुटाणे, जगदीश लाटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सेवाभावातून आयोजित करण्यात आलेल्या या महापंगतीत वारकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महापंगतीच्या माध्यमातून वारकऱ्यांची करण्यात आलेली सेवा आणि आदरातिथ्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठुरायाच्या भक्तांसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम वारकरी संप्रदायातील सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक दिंडीला भेट देऊन पाहणी केली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या, ठिकठिकाणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

COMMENTS