Homeताज्या बातम्या

भूमी सर्वेक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल; प्रशांत गुरुनाथ फोडसे यांना ’महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’

बीड: ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील सुपुत्र तथा भूमी सर्वेक्षक प्रशांत गुरुनाथ फोडसे यांना भूमी सर्वेक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वप्नपूर्ती करा; पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचे शेवगावमधील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन
अंबाजोगाईत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
जयघोषात दुमदुमला परिसर! जगदंबा विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी उत्साहात

बीड: ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील सुपुत्र तथा भूमी सर्वेक्षक प्रशांत गुरुनाथ फोडसे यांना भूमी सर्वेक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ’महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृह येथे २३ जुलै २०२६ रोजी आनंदी फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

भूमी सर्वेक्षण क्षेत्रात अचूकता, प्रामाणिकपणा आणि आधुनिक तांत्रिक कौशल्याच्या आधारे केलेल्या गुणवत्तापूर्ण कार्याची राज्यस्तरावर दखल घेत प्रशांत फोडसे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. कोणत्याही विकासकामाची सुरुवात अचूक भूमी सर्वेक्षणापासून होत असल्याने या क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रस्ते, पूल, इमारती, औद्योगिक प्रकल्प, सिंचन योजना तसेच विविध पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सर्वेक्षण हा विकासाचा भक्कम पाया मानला जातो.

या पुरस्काराचे वितरण अभिनेत्री पूजा वाघ तसेच आनंदी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष गणेश विटकर यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही गौरविण्यात आले.

प्रशांत गुरुनाथ फोडसे यांच्या या यशामुळे ठाणे जिल्हा, शहापूर तालुका आणि आसनगाव गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान झाल्याने सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भूमी सर्वेक्षण क्षेत्रात करिअर घडविणाऱ्या तरुणांसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरत आहे. या सन्मानामुळे राज्यातील भूमी सर्वेक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आणि तांत्रिक कार्यालाही नवी ओळख मिळाली असून, प्रशांत फोडसे यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

COMMENTS