Homeताज्या बातम्या

जि. प. शाळा कपिलधारवाडी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांनी साकारले वारकऱ्यांचे रुप

बीड: जिल्हा परिषद शाळा, कपिलधारवाडी येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आ

महिला भाविकाची हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत
अकोले नगराध्यक्षपदासाठी ३१ जुलैला निवडणूक; अविश्वास ठरावानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यक्रम जाहीर
NEET आंदोलन: ‘व्हिडिओ पाहण्यात रस नाही, वेळ वाया घालवू नका’; सुप्रीम कोर्टाने वकिलाला सुनावले

बीड: जिल्हा परिषद शाळा, कपिलधारवाडी येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, वारकरी तसेच संतांची आकर्षक वेशभूषा साकारत वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविले.

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी आषाढी एकादशीचे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा तसेच संतांच्या शिकवणीचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषा, पारंपरिक पोशाख आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसाने भारावून गेला.

शिक्षकांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांच्या विचारांचे आचरण दैनंदिन जीवनात करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यानंतर विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल, ज्ञानबा-तुकाराम आणि पांडुरंग हरीच्या जयघोषात परिसर दुमदुमून टाकला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा धार्मिक व संस्कारक्षम कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संतपरंपरा आणि सामाजिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले.

COMMENTS