Homeताज्या बातम्या

पंढरपुरात पूजा सुरू असताना जवानाची आत्महत्या; आषाढी एकादशीच्या बंदोबस्तावरील घटनेने खळबळ

पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर नगरीत भक्तीमय वातावरण असताना एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. वारकरी व भाविकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर तैना

राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीचा जामीन रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका
अ‍ॅड. साळुंके यांनी वकिलीला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवोद्गार,
‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींनी केले नागालँडच्या फुटबॉल उपक्रमाचे कौतुक; जागतिक योगासन स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचाही गौरव
Gangakhed jawan posted on security in Pandharpur commits suicide, shot from  service rifle during government Maha Puja

पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर नगरीत भक्तीमय वातावरण असताना एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. वारकरी व भाविकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे पंढरपुरासह संपूर्ण पोलीस दलात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, घटनेचा तपास सुरू आहे.

मृत जवानाचे नाव रामेश्वर ध्रुपद साबणे (वय ३०) असे असून ते परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात बंदोबस्तासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे सुमारे अडीच वाजेच्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा सुरू असतानाच त्यांनी स्वतःच्या शासकीय बंदुकीतून गोळी झाडून घेतली.

गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धावले. मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. कोणत्याही शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल तपास केला जात आहे. तसेच सहकारी कर्मचारी, कुटुंबीय आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन घटनेची पार्श्वभूमी जाणून घेण्याचे काम सुरू आहे.

आषाढी एकादशीसारख्या महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्यादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे भाविकांसह पोलीस दलातही शोककळा पसरली आहे. मृत जवानाच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

COMMENTS