सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील के-ड्राईव्ह मोबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि. कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्हा परिषद प

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील के-ड्राईव्ह मोबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि. कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोल्हेवस्ती (सुपा) येथे उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृह, संपूर्ण शाळा इमारतीच्या रंगकाम, बोलक्या भिंती तसेच ५ केव्ही सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.कार्यक्रमास कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट डॉ. लिना देशपांडे, प्लांट हेड विनयकुमार, एचआर व्यवस्थापक प्रवीण भालेराव, कंपनी सचिव प्रदीप धोंडीयाल यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी डॉ. लिना देशपांडे म्हणाल्या, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून भारत फोर्ज समूहातील के-ड्राईव्ह कंपनीने महाराष्ट्रासह मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि मेघालय राज्यांत सुमारे १३० ठिकाणी लोकहिताची कामे केली असून, शिक्षण क्षेत्रालाही सातत्याने हातभार लावला आहे.सुपा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी कांतीलाल ढवळे यांनी ‘मिशन आपुलकी’ उपक्रमातून अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७५ कोटी रुपयांची विकासकामे झाल्याचे सांगितले. केंद्रप्रमुख भगवान समुद्र यांनी उपलब्ध करून दिलेल्या सर्व सुविधांचा शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रभावी वापर केला जाईल, असे नमूद केले.कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. रोहन जाधव, माजी मुख्याध्यापिका वैशाली गवळी, कंपनीचे रविंद्र राऊत, जयदीप लाड, प्रणव टोमणे, निलेश भांबरे, मनीषा गवळी, मनीषा शिर्के आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय गवळी यांनी कंपनीच्या आर्थिक मदतीचा पारदर्शक व उद्देशपूर्ण वापर करण्यात आल्याचे सांगत, पारनेरसारख्या दुष्काळी भागातील इतर गरजू शाळांनाही मदतीचा हात देण्याचे आवाहन केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय दरेकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल जाधव व दत्तात्रय गवळी यांनी, तर आभार केंद्रप्रमुख भगवान समुद्र यांनी मानले.

COMMENTS