Homeताज्या बातम्या

सोनेवाडीच्या उपसरपंचपदी राजू सुंबे बिनविरोध  

अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजू मुक्ताजी सुंबे यांची बिनविरोध निवड झाली. रोटेशननुसार बेबी सचिन दळवी यांनी  उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड प्रक्रिया पार पडली.निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयात अभिनंदनाचा वर्षाव झाला. यावेळी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष सुरेश सुंबे, सरपंच विठ्ठल दळवी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक सुंबे, सोसायटीचे अध्यक्ष अरुण नारायण दळवी, माजी अध्यक्ष शिवाजी सुंबे, हभप अंबादास महाराज दळवी, शिवाजी भिवसेन सुंबे, ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी संगीता परवडकर यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी सरपंच विठ्ठल दळवी सर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच राजू सुंबे यांचे अभिनंदन करताना, “गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी ते सकारात्मक दृष्टीकोनातून काम करतील. विविध विकासकामांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहील, असा विश्वास आहे,” असे सांगितले. मावळते उपसरपंच बेबी सचिन दळवी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.नवनिर्वाचित उपसरपंच राजू मुक्ताजी सुंबे यांनी, “सोनेवाडीच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. सर्व ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून, ग्रामस्थांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करेन,” अशी ग्वाही दिली.निवडीनंतर ग्रामस्थांनी राजू सुंबे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वटपौर्णिमेनिमित्त गोळेगावात १११ वटवृक्षांचे वृक्षारोपणगटविकास अधिकारी सोनल शहा, महंत बाबागिरी महाराजांच्या हस्ते प्रारंभ  
संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त
विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

COMMENTS