बीड: नवगण शिक्षण संस्था, राजुरी (नं.) संचलित सौ. के. एस. के. महाविद्यालय, बीड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालय प्राध्यापक प्रतिनिधी
बीड: नवगण शिक्षण संस्था, राजुरी (नं.) संचलित सौ. के. एस. के. महाविद्यालय, बीड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालय प्राध्यापक प्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्व, समाजसेवेची तळमळ, शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि विकासाभिमुख विचारांचा उल्लेख केला. युवकांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळांकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर विभाग संचालक प्रा. डॉ. ए. ए. खान, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. परमेश्वर वाणी, प्रा. डॉ. पी. पी. गायके, प्रा. डॉ. सय्यद इमोनोद्दीन, प्रा. डॉ. इरलापल्ले, स्टाफ सेक्रेटरी प्रा. भीमराव मंडलिक, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वंदना फटाले यांनी केले. त्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त परिचय देत त्यांच्या कार्याची प्रेरणादायी माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत करण्यात आले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पी. आर. वाणी यांनी केले.

COMMENTS