Homeताज्या बातम्या

ब्रेडच्या पुड्यात माशी; ’गोदावरी स्वीट बेकरी’च्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह! ग्राहकाचा संताप, व्हिडिओ व्हायरल

नांदेड: शहरातील व्हीआयपी रोडवरील प्रसिद्ध गोदावरी स्वीट बेकरी येथे विक्रीसाठी ठेवलेल्या ब्रेडच्या एका बंद पुड्यात माशी आढळल्याचा धक्कादायक प्रक

मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; पुढील चार दिवस अनेक भागांत सतर्कतेचा इशारा
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा गुंडांना दणका; धोकादायक गुंड एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तख्त श्री हजूर साहिबकडून विशेष सत्कार

नांदेड: शहरातील व्हीआयपी रोडवरील प्रसिद्ध गोदावरी स्वीट बेकरी येथे विक्रीसाठी ठेवलेल्या ब्रेडच्या एका बंद पुड्यात माशी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, संबंधित ग्राहकाने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे बेकरीतील स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि उत्पादन प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील उच्चभ्रू ग्राहकांची पसंती असलेल्या या प्रतिष्ठानात मिठाई, बेकरी पदार्थ आणि चाटचे दर तुलनेने अधिक असल्याचे ग्राहक सांगतात. मात्र, अधिक किंमत मोजूनही दर्जेदार व सुरक्षित अन्न मिळत नसल्याची भावना या घटनेमुळे व्यक्त होत आहे. संबंधित ग्राहकाने ब्रेडच्या पुड्यातील माशी दाखवत व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता, “गलती हो गई… दूसरा पुडा देता हूँ”, असे उत्तर देत केवळ दुसरा पुडा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये आणखी नाराजी पसरली आहे.

बंदिस्त ब्रेडच्या पुड्यात माशी पोहोचली तरी कशी? उत्पादन प्रक्रियेत निष्काळजीपणा झाला का? गुणवत्ता तपासणीची यंत्रणा कार्यरत आहे का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहेत. तसेच दुकानाबाहेर उघड्यावर विक्री होणार्‍या चाट पदार्थांच्या स्वच्छतेबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तातडीने गंभीर दखल घेऊन गोदावरी स्वीट बेकरीच्या उत्पादन विभाग, स्वयंपाकघर आणि साठवण व्यवस्थेची सखोल तपासणी करावी, अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. दरम्यान, या घटनेबाबत बेकरी व्यवस्थापनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाच्या तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असली, तरी या घटनेने शहरातील खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS