Homeताज्या बातम्या

स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी पॉलिटेक्निकमध्ये वृक्षारोपण

श्रीगोंदा: स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या इंदिरा गांधी पॉलिटेक्निक, बेलवंडी (शु.) येथे व

दिल्लीतील आंदोलनाला अकोले राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) पाठिंबा; तहसीलदारांना दिले निवेदन
महावितरणच्या कोतूळ उपकेंद्राचा कारभार रामभरोसे; ‘सहाय्यक अभियंता’ पद रिक्त; वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांत संताप
पेपरफुटीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बीडमध्ये धरणे आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा- राजेंद्र मस्के

श्रीगोंदा: स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या इंदिरा गांधी पॉलिटेक्निक, बेलवंडी (शु.) येथे वृक्षारोपण व प्रतिमापूजनाचा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली.

श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन मेघा संदीप औटी तसेच संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाच्या माध्यमातून स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत भोईटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन लक्षात घेता प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. वृक्ष लागवड ही केवळ औपचारिकता न राहता त्याचे संवर्धन आणि संगोपन करणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. महाविद्यालय परिसर अधिक हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी अशा सामाजिक व पर्यावरणविषयक उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS