Homeताज्या बातम्या

अरणगाव येथे रविवारी भव्य रथयात्रा; आषाढी एकादशी व द्वादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अहिल्यानगर: आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी द्वादशीला साक्षात पांडुरंग नगरजवळील अरणगाव येथील श्री संत बुवाजी बुवा महाराज मंदिरात येतात, अशी भावि

निर्भीड पत्रकार संघाच्या परळी तालुका अध्यक्षपदी बालाजी ढगे, उपाध्यक्षपदी कृष्णा सरवदे यांची बिनविरोध निवड
कर्जमुक्तीसोबतच नैसर्गिक शेतीकडे वळा; शेतकऱ्यांना प्रशासनाचे आवाहन, अहिल्यानगरमध्ये नऊ हजार हेक्टरवर नैसर्गिक शेती
मृग नक्षत्र कोरडे; बीड जिल्ह्यात शेतकरी हवालदिल! कापूस, सोयाबीन पिकांवर पावसाअभावी संकट

अहिल्यानगर: आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी द्वादशीला साक्षात पांडुरंग नगरजवळील अरणगाव येथील श्री संत बुवाजी बुवा महाराज मंदिरात येतात, अशी भाविकांमध्ये श्रद्धा व आख्यायिका आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. परिसरासह अहिल्यानगर शहरातील सुमारे २५ हजार भाविक दरवर्षी येथे उपवास सोडण्यासाठी एकत्र येतात. देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त द्वादशीच्या दिवशी गावात पारंपरिक रथयात्रा काढण्यात येते.

संतांची पावन भूमी असलेल्या अरणगाव येथे श्री संत बुवाजी बुवा महाराज यांच्या पुण्यभूमीत आषाढी सप्ताह, अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. सप्ताहादरम्यान दैनंदिन कार्यक्रमांत काकडा भजन, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, आरती, कीर्तन आणि गावोगावचे जागर आयोजित केले जात आहेत.

दि. २५ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजता अभिषेक व एकादशीची महापूजा खासदार निलेश लंके आणि अरणगावचे सरपंच पोपट विठ्ठल पुंड यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर दि. २६ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजता द्वादशीची महापूजा आमदार अक्षय कर्डिले आणि ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या हस्ते होईल.

दुपारी निघणाऱ्या पारंपरिक रथ मिरवणुकीची पूजा दत्त देवस्थान सत्संग मंडळ, माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार काशीनाथ दाते, आमदार संग्राम जगताप, जगन्नाथ देवकर, अभय आगरकर, संदेश कार्ले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS