अहिल्यानगर: विद्या प्रतिष्ठान (महाराष्ट्र) नगर केंद्र, प. पू. डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पदव्युत्तर महाविद्

अहिल्यानगर: विद्या प्रतिष्ठान (महाराष्ट्र) नगर केंद्र, प. पू. डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पदव्युत्तर महाविद्यालय व संशोधन केंद्र, केडगाव देवी रोड येथील बी.एड. द्वितीय वर्ष (शैक्षणिक वर्ष २०२५-२६) परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात महाविद्यालयातील सर्व ४३ विद्यार्थी-शिक्षक उत्तीर्ण झाले. निकालात २७ विद्यार्थी-शिक्षकांनी ‘ओ’ ग्रेड, १५ जणांनी ‘ए प्लस’ ग्रेड, तर एका विद्यार्थ्याने ‘ए’ ग्रेड मिळवत महाविद्यालयाच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली.
महाविद्यालयात मंजुषा दीपक बोरुडे हिने सीजीपीए ९.८५ (८२.८५ टक्के) गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. वैष्णवी दयानंद इनामदार कलेढोणकर (सीजीपीए ९.७५, ८१.१५ टक्के) हिने द्वितीय, साक्षी अरविंद लोंढे (सीजीपीए ९.५३, ७९.७५ टक्के) हिने तृतीय, ईशा याकोब साळवे (सीजीपीए ९.४५, ७९.५० टक्के) हिने चतुर्थ, तर अंजली सुहास हराळ (सीजीपीए ९.४०, ७९.५० टक्के) हिने पाचवा क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, कार्यवाह सोमनाथ दिघे, सहकार्यवाह तथा माजी प्राचार्य प्रा. डॉ. रवींद्र चोभे, नवनियुक्त प्राचार्य प्रा. डॉ. शिवाजीराव देसाई, माजी प्राचार्य प्रा. डॉ. अमरनाथ कुमावत, उपप्राचार्य प्रा. डॉ. गोकुळदास लोखंडे, विभागप्रमुख प्रा. डॉ. शर्मिला पारधे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रदीप शेळके, प्रा. डॉ. अविनाश भांडारकर, प्रा. डॉ. दादासाहेब काजळे, प्रा. डॉ. आश्लेषा भांडारकर, प्रा. रुपाली ओक, प्रा. विलास पांढरे, प्रा. मनिषा वर्पे, प्रा. सुनील वाकचौरे, प्रा. अनिता लवांडे, प्रा. विशाल जाधव तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रमोद राणा, सतीश लवांडे, दीपक आढाव, तेजस रोकडे, जयवंतराव मुळे, दर्शन राहिंज आणि विद्यार्थी प्रतिनिधी कुलदीप कुलकर्णी यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS