पुणे: जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे गोठ्यात झोपलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि

पुणे: जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे गोठ्यात झोपलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २२ जुलै) पहाटे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
भाग्यश्री संदीप वारे (वय ५, मूळ रा. करोडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर; सध्या रा. पिंपळसुटी, ता. शिरूर) असे मृत चिमुरडीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्रीचे कुटुंब पिंपळसुटी येथील मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या गोठ्यात झोपले होते. बुधवारी पहाटे सुमारे २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला करून भाग्यश्रीला उचलून नेल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

COMMENTS