बीड: राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने श्रीनिवास राऊत यांची बीड जिल्हा सरचिटणी

बीड: राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने श्रीनिवास राऊत यांची बीड जिल्हा सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के व युवक जिल्हाध्यक्ष सतीसबाप्पा शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी शिवराजजी बांगर, बाबासाहेब शिंदे पाटील, महादेव गंगणे पाटील तसेच शेख बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती.
नियुक्तीनंतर उपस्थित मान्यवरांनी श्रीनिवास राऊत यांचे अभिनंदन करून पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी तसेच युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. श्रीनिवास राऊत यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारांना अनुसरून पक्षवाढीसाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी श्रीनिवास राऊत यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS