गेवराई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) च्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने, तलवडा गावचे सुपुत्र सुनील सखाराम आठवले यांची राष्ट्रवादी

गेवराई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) च्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने, तलवडा गावचे सुपुत्र सुनील सखाराम आठवले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या गेवराई तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. पक्षासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या निवडीनंतर आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, युवक जिल्हाध्यक्ष सतीश बप्पा शिंदे आणि युवा कार्याध्यक्ष राहुल काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते सुनील आठवले यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे प्रवक्ते शिवराज बांगर आणि गेवराई तालुकाध्यक्ष आण्णासाहेब राठोड यांचीही विशेष उपस्थिती होती.
यावेळी नियुक्तीपत्र देताना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने अपेक्षा व्यक्त केली की, सुनील आठवले पक्ष संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील. तसेच, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असा विश्वास पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
या नियुक्ती सोहळ्याला उमेश भाऊ गायकवाड, खांडवीचे उपसरपंच विनायक चव्हाण, साहेबराव राठोड, संतोष चव्हाण व मजेर शेख यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपली निवड झाल्याबद्दल सुनील आठवले यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले असून, पक्ष वाढवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS