Homeताज्या बातम्या

पेपरफुटीचे ’धंदे’ अन् बेरोजगारांचे ’फास’: किनवटमध्ये व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारा सत्याग्रह!

किनवट: दिवसरात्र अभ्यास करून उराशी सरकारी नोकरीचं स्वप्न बाळगायचं, पण ऐन परीक्षेच्या दिवशी पेपर फुटून भविष्याचा कचरा व्हायचा... हा आजच्या भारताचा

ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव; बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाविरोधात लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान
खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ; सत्तेत जाताच वाढली मुजोरी, राज्यभरातून तीव्र संताप
जिल्ह्यात पीएम राहत योजना प्रभावीपणे राबवा: जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
DYFI किनवट च्या वतीने आज दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनास पाठींबा  देण्यासाठी प्रचंड रॅली काढण्यात आली., #sonamwangchuk #cjp #kinwat #nanded  #protest

किनवट: दिवसरात्र अभ्यास करून उराशी सरकारी नोकरीचं स्वप्न बाळगायचं, पण ऐन परीक्षेच्या दिवशी पेपर फुटून भविष्याचा कचरा व्हायचा… हा आजच्या भारताचा नवा ‘विकास’ झाला आहे! ’नीट’ आणि ’एमपीएससी’ सारख्या परीक्षांचे बाजार मांडणार्‍या दलालांच्या आणि गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाच्या छाताडावर पाय देऊन आज किनवटचा तरुण रस्त्यावर उतरला. ‘विद्यार्थी-युवक कृती समिती’ आणि ‘डीवायएफआय’च्या बॅनरखाली गोकुंदा येथील ठाकरे चौकातून निघालेल्या ’सदभावना रॅली व सत्याग्रहाने’ भ्रष्ट व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली.

दि. २० जुलै रोजी गोकुंदा ते सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या भव्य रॅलीने शब्दांपेक्षा शांततेचा आणि सत्याग्रहाचा आवाज अधिक शक्तिशाली असतो, हे दाखवून दिले. हजारो बेरोजगार तरुण, पालक आणि नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे दिलेल्या निवेदनातून आंदोलकांनी प्रशासनाला पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ’एनटीए’ सारख्या खाजगी कंपन्यांचे कंत्राट रद्द करून स्पर्धा परीक्षा फक्त आणि फक्त शासकीय यंत्रणेमार्फतच घ्याव्यात, अशा थेट मागण्या केल्या आहेत.

तसेच ’एमपीएससी’च्या सर्व परीक्षा केवळ ‘ऑफलाईन’ पद्धतीनेच पारदर्शक वातावरणात घेण्यात याव्यात, ’टीईटी’ परीक्षा फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, दिल्लीतील जंतर-मंतरवर उपोषणाला बसलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या मागण्या केंद्र सरकारने तातडीने मान्य कराव्यात आणि केंद्र व राज्यातील रिक्त पदांवर पारदर्शक पद्धतीने भरती करावी, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या आंदोलनाला शेतकरी नेते अर्जुन आडे, नंदिनीताई टारपे, प्रशांत कोरडे, के. मूर्ती, जयवंत वानोळे आणि जनार्धन काळे यांच्यासह अनेक स्पर्धा परीक्षा केंद्र चालकांनी पाठिंबा दिला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रशांत जाधव, इरफान पठाण, दिनेश आडे, नांदकुमार मोडूकवार, शिवम राठोड, श्रीनिवास आडे, अविनाश चव्हाण आणि शेख बाबा यांनी परिश्रम घेतले. किनवटच्या या सत्याग्रहाने आता आश्वासनं नको, तर हक्काचा रोजगार आणि पारदर्शक परीक्षाच हव्यात असा थेट इशारा शासनाला दिला आहे.

COMMENTS