बीड: नवगण शिक्षण संस्था, राजुरी (न.) संचलित सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीड येथील राष्ट्रीय सेव

बीड: नवगण शिक्षण संस्था, राजुरी (न.) संचलित सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवगण शिक्षण संस्थेच्या सहसचिव मा. डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या शुभहस्ते महाविद्यालय परिसरात बकुळ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी बोलताना डॉ. दीपाताई क्षीरसागर म्हणाल्या की, पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक असमतोल यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे जतन केले पाहिजे. ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम केवळ वृक्ष लागवडीपुरता मर्यादित नसून, पर्यावरणाप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक प्रेरणादायी संदेश आहे.
यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. विश्वंभर देशमाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर विभागप्रमुख डॉ. खान ए. एस., उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. आर. वाणी, डॉ. सय्यद इमाद, डॉ. पी. पी. गायके, डॉ. पी. बी. इरलापल्ले, डॉ. जयंत साठे तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याबरोबरच वृक्षसंवर्धनाची प्रेरणा देण्यात आली.

COMMENTS