Homeताज्या बातम्या

पाण्याचा घोट, हरिपाठाची भेट; दत्ता वाकसे यांची वारकर्‍यांना प्रेमाची साथ! मकरध्वज दिंडीला महाप्रसाद

वडवणी: आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकर्‍यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानत मल्हार ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष दत

बीडमध्ये आरक्षण वर्गीकरणावर परिसंवादाचे आयोजन; ५ जुलै रोजी सामाजिक न्याय भवनात होणार चर्चा
मुंबईत मुसळधार पाऊस, तरीही टप्पा वाढीसाठी विनाअनुदानित शिक्षकांचा एल्गार कायम; आझाद मैदानावर तिसऱ्या दिवशीही ठिय्या
लोकमंथन इफेक्ट : उघड्या विहिरीला बांधले संरक्षण कठडे; घारगाव-पिंपळगाव पिसा रस्त्यावरील संभाव्य धोका टळला

वडवणी: आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकर्‍यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानत मल्हार ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष दत्ता वाकसे यांनी सेवाभावी उपक्रम राबविला. दिंडीतील वारकर्‍यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट पाकिटे तसेच हरिपाठाची पुस्तके वाटप करून त्यांनी वारकर्‍यांप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली.

या उपक्रमामुळे थकलेल्या वारकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला. वारकरी संप्रदायातील हरिनाम भक्तीचा संदेश अधिकाधिक भाविकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हरिपाठाची पुस्तके भेट देण्यात आली. तसेच मकरध्वज दिंडीतील वारकर्‍यांसाठी महाप्रसादाच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने वारकर्‍यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी बोलताना दत्ता वाकसे म्हणाले की, वारकर्‍यांची सेवा म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाची सेवा आहे. भक्ती, सेवाभाव आणि सामाजिक एकोप्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन यापुढेही सुरू राहील.

या सेवाकार्यात मल्हार ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष दत्ता वाकसे, महारुद्र जोशी, संतराम हजारे, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोठुळे, बाबुराव मात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सेवाभावी उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS