Homeताज्या बातम्या

कोकणगाव तुळजाभवानी मंदिरासाठी २० लाखांचा निधी; माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश

संगमनेर: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून १७१ गावे असलेल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात मंदिरांसाठी मोठा न

लग्नाच्या आमिषाने व्यावसायिकाची अडीच लाखांची फसवणूक; लग्न लावून नवरी झाली पसार, राहाता पोलिसांत गुन्हा दाखल
काळे गटाचे बिंग फुटले, आंदोलनाच्या नौटंकीचा डाव उधळला : उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचा घणाघात
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा गुंडांना दणका; धोकादायक गुंड एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

संगमनेर: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून १७१ गावे असलेल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात मंदिरांसाठी मोठा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व गावांमध्ये समाज मंदिरांसह अद्यावत मंदिरे झाली असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत तुळजाभवानी मंदिरासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

कोकणगाव येथे तुळजाभवानी माता मंदिराच्या सभा मंडपासाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचा प्रारंभ संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सुरेश थोरात व हरिभक्त परायण भागवत बाबा यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी सरपंच सौ. आशाताई जोंधळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी जोंधळे, उपसरपंच दिलीप जोंधळे, ॲड. सुरेश जोंधळे, पोपट थोरात, मधुकर पवार, संभाजी जोंधळे, डॉ. दत्तात्रय जोंधळे, नानासाहेब वायकर, हनुमंत जोंधळे, मारुती जोंधळे, बाबासाहेब वायकर, बाबू नाना वायकर, दिगंबर जोंधळे, तुकाराम जोंधळे, नवनाथ वायकर, कचरू जोंधळे आदींसह विविध ग्रामस्थ उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील निझरनेश्वर, खांडगाव येथील खांडेश्वर, धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर, जवळे बाळेश्वर येथील बाळेश्वर, कोकणगाव येथील दुधेश्वर, अमृतेश्वर यांसह विविध महादेवांच्या मंदिरांना पर्यटन विकास योजनेअंतर्गत मोठा निधी दिला असून हे सर्व तीर्थक्षेत्र सर्व भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या सर्व क्षेत्रांचा विकास माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून झाला असल्याचे सुरेश थोरात यांनी म्हटले आहे.

COMMENTS