Homeताज्या बातम्या

संगमनेरकरांना शासनाच्या बफर स्टॉक मधून ३५० मे.टन युरिया; काँग्रेसच्या आंदोलनाला यश

संगमनेर: माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीने संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासनाच्य

मोकाट जनावरे आणि वराहांचा हैदोस; पेरणीनंतर शेतकर्‍यांवर संकट, कारवाई न झाल्यास नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलनाचा इशारा
रानडुकरांचा हैदोस; कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे डाळिंब बागेचे लाखोंचे नुकसान, वन विभागाकडे भरपाईची मागणी
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह कुटुंबावर जमिनीच्या गैरव्यवहाराचे गंभीर आरोप; भाजप आक्रमक

संगमनेर: माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीने संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासनाच्या ताब्यातील बफर स्टॉक मधून युरिया मिळावा याकरता आंदोलन केले होते. या मागणीची दखल घेऊन सरकारकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना ३५० मे. टन युरिया मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या खरीप हंगाम सुरू असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका, सोयाबीन, बाजरी यांसह विविध पिकांची पेरणी केली आहे. काही भागांमध्ये पेरणी सुरू आहे. या पिकांसाठी युरिया खत गरजेचे असल्याने शेतकऱ्यांची युरियासाठी सातत्याने मोठी मागणी होती, मात्र युरिया उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे संगमनेर तालुका काँग्रेस व तालुक्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन १४ जुलै २०२६ रोजी उपविभागीय कृषी अधिकारी यांना शासनाच्या ताब्यात असलेल्या युरियाच्या बफर स्टॉक मधून युरिया मिळावा अशी आग्रही मागणी केली होती. त्यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना युरिया पुरवण्याचे आश्वासन दिले होते.

यानंतर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२६-२७ मधील उपलब्ध संरक्षित साठ्यामधून ३४९.५२ मे. टन युरिया कृषी विक्रेत्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून तालुक्यात रिमझिम पावसाने सुरुवात केली असून अत्यंत महत्त्वाच्या वेळेस शासनाकडून बफर स्टॉक खुला झाल्याने शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध होणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिलासा मिळाला असून सर्व शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात तातडीने आणि सहजरित्या युरिया मिळाला पाहिजे, अशी मागणी गुंजाळवाडीचे सरपंच तथा प्रगतशील शेतकरी नरेंद्र गुंजाळ यांनी केली आहे.

“माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना युरियासह सर्व सुविधा व शासकीय योजनांचा सहजपणे लाभ मिळत होता. मात्र मागील दोन वर्षांपासून जाणीवपूर्वक संगमनेर तालुक्याला डावलले जात आहे. काँग्रेसच्या आंदोलनातून आता थोड्या प्रमाणात युरिया उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.” — नामदेव शिंदे (शेतकरी, वाघापूर)

COMMENTS