Homeताज्या बातम्या

हलक्या पावसाच्या सरींनी बळीराजाला दिलासा

चासनळी : यंदा उन्हाळ्यातील विक्रमी तापमान आणि अल् निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला झालेला विलंब तसेच सुरुवातीला झालेल्या अल्प पावसामुळे खरिप हंगामातील पेरण्या उशिरा झाल्या. उपलब्ध झालेल्या मोजक्याच ओलाव्यावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका आदी पिकांची पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली होती.गेल्या दोन दिवसांपासून परिसरात झालेल्या हलक्या पावसाच्या सरींमुळे नव्याने उगवलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तान्ह्या पिकांना आवश्यक ओलावा मिळाल्याने त्यांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांच्या चिंतेत काही प्रमाणात घट झाली आहे.तथापि, पिकांची जोमदार वाढ आणि चांगल्या उत्पादनासाठी अद्यापही दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हलक्या सरींनी दिलासा मिळाला असला तरी बळीराजाचे लक्ष आता पुढील जोरदार पावसाकडे लागून आहे.  

चेन्नई येथील भक्ताकडून १३ लाखांचा शंख साई चरणी अर्पण
पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्नावर अधिवेशनात आवाज उठविण्यासाठी संघटनेने घेतली आमदार लहामटे यांची भेट
अकोलेकरांना वन्यजीव प्रवेश शुल्कातून सूट द्याग्राहक पंचायतचे तहसील प्रशासनाला निवेदन; अन्यथा आंदोलनाचा इशारा
Sangli News : आषाढाच्या सरींमुळे मिळाला थोडासा दिलासा

COMMENTS