Homeताज्या बातम्या

सांगवीच्या वीजप्रश्नांसाठी नगरसेविका मीनल पाटील यांचा पाठपुरावा; पालकमंत्र्यांकडून तातडीच्या कारवाईचे आदेश

प्रभागातील नागरिकांना भेडसावणार्‍या विद्युत समस्यांचा कायमस्वरूपी निपटारा व्हावा, यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका मीनल पाटील यांनी नांदेड जिल्ह्याचे

महाराष्ट्रातून स्वच्छ ऊर्जेला नवे बळअणुऊर्जा क्षेत्रात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक : मुख्यमंत्री फडणवीस
औरंगाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आ.विलास भुमरे उपाध्यक्षपदी रामराव शेळके यांची बिनविरोध निवड
नारवट वन पर्यटनस्थळी कथित वीजचोरीचा गंभीर आरोप; महावितरणच्या दुर्लक्षामुळे शासनाला लाखोंचा फटका?अवैध वीजवापर, उघड्या विद्युत तारा आणि विकासनिधीच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह; सखोल चौकशीची मागणी



प्रभागातील नागरिकांना भेडसावणार्‍या विद्युत समस्यांचा कायमस्वरूपी निपटारा व्हावा, यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका मीनल पाटील यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतून भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे परिसरातील वीज सुविधांच्या बळकटीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मीनल पाटील यांनी सादर केलेल्या निवेदनात सिद्धार्थ नगर, त्रिरत्न नगर, अंबानगर (मालटेकडी), गुरुनगर, कर्मवीर नगर, गजानन सोसायटी, पांडुरंग नगर, गोविंद नगर, विठ्ठल नगर, मेहबूब नगर, सांगवी मुळगाव, बाबा कॉलनी, लक्ष्मी नगर, रत्नेश्वरी नगर, माधव नगर, गौतम नगर-रामनगर आणि उजाला नगर या भागांमध्ये 200 नवीन विद्युत खांब, आवश्यक विद्युत तारा तसेच 10 नवीन विद्युत रोहित्र मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीची दखल घेत पालकमंत्री अतुल सावे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. आवश्यक त्या ठिकाणी नवीन रोहित्र बसविणे, विद्युत खांब उभारणे आणि वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी त्वरित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नगरसेविका मीनल पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सांगवी प्रभागातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वीज समस्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, नागरिकांनीही या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.

COMMENTS