Homeताज्या बातम्या

अवैध रेती वाहतुकीवर भाग्यनगर पोलिसांची कारवाई; टिप्परसह 5.65 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत भाग्यनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा टि

खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकार्‍यांकडे;महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय
गोदापात्रातील अवैध वाळू उपशावर कारवाईकोपरगाव पोलिसांची कामगिरी ; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
शेवगावात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईस्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त



नांदेड जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत भाग्यनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा टिप्पर व रेती असा एकूण 5 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 18 जुलै रोजी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गस्ती दरम्यान गुरुद्वारा चौक परिसरात गाडी क्रमांक एमएच- 43 -वाई- 6390 क्रमांकाचा टाटा कंपनीचा टिप्पर अडवून तपासणी केली. वाहनात सुमारे अडीच ब्रास रेती आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवाना किंवा कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी वाहनासह रेती जप्त केली. या कारवाईत 5 लाख 50 हजार रुपये किमतीचा टिप्पर आणि 15 हजार रुपये किमतीची रेती असा एकूण 5 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक आकाश प्रकाश घोडे (वय 31) याच्याविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.  ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

COMMENTS