Homeताज्या बातम्या

नांदेड जिल्हा बँक निवडणूक: ’अशोकराव चव्हाणांच्या गडाला सुरुंग’; युवा नेत्यांचे ’बँक बचाव’ पॅनल मैदानात!

सहकारी क्षेत्रातील राजकीय गणिते आता पूर्णपणे बदलू लागली आहेत. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत याचे थेट प्रत्यंतर येत आहे.

एज्युव्हिजन व न्यू इरा किड्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘यमी टम्मी’ आनंदनगरी उत्साहात
अवैध दारूविक्रीची बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून पत्रकारावर हल्ला; जबरदस्तीने मोटारसायकलवर उचलून नेण्याचा प्रयत्न; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
शासकीय योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा-तहसीलदार रेणुकादास देवणीकरपार्डी (म) येथे विकसित भारत अभियानांतर्गत गावफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद



सहकारी क्षेत्रातील राजकीय गणिते आता पूर्णपणे बदलू लागली आहेत. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत याचे थेट प्रत्यंतर येत आहे. सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत ही निवडणूक ’बिनविरोध’ करण्यासाठी पडद्यामागे जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र, प्रस्थापित राजकारण्यांच्या या ’फिक्सिंग’ला जिल्ह्यातील तरुण तुर्कांनी (युवा नेत्यांनी) थेट आव्हान दिले आहे. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या होमग्राउंडवरच, म्हणजेच भोकर मतदारसंघात या युवा शक्तीने सुरुंग लावल्यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. बिनविरोधचे मनसुबे उधळले गेल्याने आता बँकेच्या सत्तेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
प्रस्थापितांच्या वर्चस्ववादाला शह देण्यासाठी जिल्ह्यातील आठ प्रमुख उमेदवारांनी एकत्र येत ’बँक बचाव आघाडी’ अंतर्गत ’शेतकरी विकास पॅनल’ ची अधिकृत घोषणा केली आहे. या आघाडीने ’छत्री’ या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून, यामुळे प्रस्थापित नेत्यांसमोर मोठे धर्मसंकट उभे राहिले आहे. या निवडणुकीत सर्वाधिक हायव्होल्टेज ड्रामा भोकर मतदारसंघात पाहायला मिळत आहे. मुदखेड पतसंस्था मतदारसंघातून मारोतराव पाटील व्यवहारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. छाननी प्रक्रियेदरम्यान व्यवहारे यांचा अर्ज बाद करण्यासाठी चव्हाणांच्या टीमने पूर्ण ताकद लावली होती. मात्र, विभागीय सहनिबंधकांकडे दाद मागितल्यानंतर व्यवहारे यांचा अर्ज वैध ठरला. यामुळे चव्हाण छावणीला मोठा कायदेशीर धक्का बसला असून, मुदखेड-भोकर पट्ट्यात चव्हाणांना थेट आव्हानाचा सामना करावा लागत आहे. भोकर विधानसभा मतदारसंघांतर्गत येणार्‍या मुदखेड, अर्धापूर आणि भोकर या तीन तालुक्यांमध्ये काँग्रेसचे संदीपकुमार देशमुख बारडकर आणि तिरुपती कोंडेकर यांनी घेतलेली भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे. व्यवहारे यांचा अर्ज वैध ठरवण्यासाठी प्रा. संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी सहकार मंत्र्यांपासून ते मंत्रालयापर्यंत जोरदार पाठपुरावा केला. या कायदेशीर लढाईतील विजयामुळे जिल्हा बँक वर्तुळात तरुण तुर्कांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. जिल्ह्यातील 11 वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले असले, तरी उर्वरित 12 जागांवर आता काँटे की टक्कर होणार आहे. ’शेतकरी विकास पॅनल’कडून रिंगणात उतरलेले प्रमुख शिलेदार खालीलप्रमाणे आहेत. भोकर तालुका:  माधवराव मातुलकर अर्धापूर: ज्ञानेश्वर राजेगोरे मुदखेड: मारोतराव व्यवहारे माहूर: ज्योतिबा खराटे धर्माबाद: गोविंदराव जाधव याशिवाय, ज्ञानेश्वर राजेगोरे (इतर मागासवर्गीय), उकंडराव जाधव (विशेष मागास प्रवर्ग) आणि प्रतिमा येरडलावार (अनुसूचित जाती-जमाती) यांनीही पॅनलतर्फे उमेदवारी जाहीर करून आघाडी मजबूत केली आहे. बँकेचे आधारवड राहिलेले पद्मश्री शामराव कदम यांचे छायाचित्र या पॅनलच्या निवडणूक पत्रकावर वापरून मतदारांना भावनिक साद घालण्यात आली आहे. तिरुपती कोंडेकर यांचे वडील बँकेचे माजी संचालक असले तरी त्यांनी स्वतः निवडणूक न लढवता या तरुण फळीला पाठबळ दिले आहे. प्रस्थापित नेत्यांची प्रतिष्ठा आणि तरुण तुर्कांचे बंड यांमुळे ही निवडणूक आता केवळ बँकेच्या सत्तेपुरती मर्यादित न राहता, जिल्ह्याच्या भविष्यातील राजकीय अस्तित्वाची लढाई बनली आहे.

COMMENTS