Homeताज्या बातम्या

सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

श्रीगोंदा : तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक महाविद्यालय परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. “एक विद्यार्थी – एक झाड” या संकल्पनेवर आधारित उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याची वर्षभर निगा राखण्याची जबाबदारी स्वीकारली. यावेळी सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे वितरित करण्यात आली. कार्यक्रमास ज्ञानदीप ग्रामीण विकास संस्थेचे निरीक्षक बी. के. लगड, तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे ऑडिटर भापकर सर, निरीक्षक एस. पी. गोलांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल नागवडे तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना बी. के. लगड यांनी पर्यावरण संवर्धन ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. वृक्ष लागवडीनंतर त्यांचे संगोपन व संवर्धन करणे हेच खरे पर्यावरण संरक्षण असल्याचा संदेश त्यांनी दिला. प्राचार्य डॉ. अमोल नागवडे यांनी प्रस्ताविकेत उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या झाडाची वर्षभर जबाबदारी स्वीकारायची आहे. प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांनी आपल्या झाडाचा फोटो काढून त्याची वाढ, देखभाल आणि सद्यस्थितीची नोंद करायची असून संबंधित शिक्षक त्याचा नियमित आढावा घेणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची सवय आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ होईल. उपक्रमाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे वर्षाच्या अखेरीस प्रत्येक झाडाचे जिओ-टॅगिंग करून त्याचा अंतिम आढावा घेतला जाणार आहे. तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक राजेंद्र नागवडे यांच्या पर्यावरणपूरक संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

’हरित बीड’ करण्यासाठी सजग नागरिकांनी पुढे यावे – राहुल मोरे
स्वारातीम विद्यापीठात ‘वन महोत्सव’ व ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत 100 वृक्षांचे वृक्षारोपण
साहित्य भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी बापू दासरी, कार्याध्यक्षपदी रोहिणी पांडे यांची निवड

श्रीगोंदा : तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक महाविद्यालय परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. “एक विद्यार्थी – एक झाड” या संकल्पनेवर आधारित उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याची वर्षभर निगा राखण्याची जबाबदारी स्वीकारली. यावेळी सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे वितरित करण्यात आली.

कार्यक्रमास ज्ञानदीप ग्रामीण विकास संस्थेचे निरीक्षक बी. के. लगड, तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे ऑडिटर भापकर सर, निरीक्षक एस. पी. गोलांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल नागवडे तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना बी. के. लगड यांनी पर्यावरण संवर्धन ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. वृक्ष लागवडीनंतर त्यांचे संगोपन व संवर्धन करणे हेच खरे पर्यावरण संरक्षण असल्याचा संदेश त्यांनी दिला.

प्राचार्य डॉ. अमोल नागवडे यांनी प्रस्ताविकेत उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या झाडाची वर्षभर जबाबदारी स्वीकारायची आहे. प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांनी आपल्या झाडाचा फोटो काढून त्याची वाढ, देखभाल आणि सद्यस्थितीची नोंद करायची असून संबंधित शिक्षक त्याचा नियमित आढावा घेणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची सवय आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ होईल.

उपक्रमाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे वर्षाच्या अखेरीस प्रत्येक झाडाचे जिओ-टॅगिंग करून त्याचा अंतिम आढावा घेतला जाणार आहे. तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक राजेंद्र नागवडे यांच्या पर्यावरणपूरक संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

COMMENTS