Homeताज्या बातम्या

संत मुक्ताबाई पालखीचे दर्शन घेऊन आ. संदीप क्षीरसागर यांनी घेतला महाप्रसाद

संतश्रेष्ठ मुक्ताबाई पालखीचे बीड शहरात आगमन झाल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी भक्तिभावाने पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमद

आषाढी  एकादशीच्या पार्श्वभूमीवर आढावादिंडीत येणार्‍या वारकर्‍याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
गोदरी ते पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळाचे दत्त संस्थान, बालाघाट येथे उत्स्फूर्त स्वागतवारकर्‍यांसाठी नाश्ता व प्रसादाची सेवा
318 वर्षांच्या परंपरेत नवा इतिहाससंत मुक्ताई पालखीचा रिंगण सोहळा प्रथमच जालन्यात



संतश्रेष्ठ मुक्ताबाई पालखीचे बीड शहरात आगमन झाल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी भक्तिभावाने पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार सय्यद सलीम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष अशोक रोमन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दर्शनानंतर कबाड गल्ली येथे संत मुक्ताबाई पालखीच्या आगमनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक अन्नदान सोहळ्यात सहभागी होत आमदार संदीप क्षीरसागर यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन आदर्श मित्र मंडळ, कबाड गल्ली यांच्या वतीने करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही संत मुक्ताबाई पालखीचे बीड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेऊन भक्तीभाव व्यक्त केला. पालखीच्या मुक्कामानंतर परंपरेनुसार कबाड गल्ली परिसरातील पंचांच्या वाड्यात आदर्श मित्र मंडळाच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या अन्नदान सोहळ्यात वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला. अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली अन्नदानाची ही परंपरा आदर्श मित्र मंडळाने जपली असून, सामाजिक आणि धार्मिक ऐक्याचे प्रतीक म्हणून ती आजही कायम आहे.

COMMENTS