Homeताज्या बातम्या

संत मुक्ताई मार्ग नामकरण सोहळ्याची नोंद सुवर्णाक्षरांनी घेतली जाईल – पालखी सोहळाप्रमुख रविंद्र महाराजसंत मुक्ताई मार्गाच्या नामकरणाने बीडच्या अध्यात्मिक परंपरेला नवे वैभव मिळाले – आ. विजयसिंह पंडितसंत, महंत व वारकर्‍यांच्या उपस्थितीत सुभाष रोडचे संत मुक्ताई मार्ग नामकरण संपन्न

संतश्रेष्ठ मुक्ताईच्या पालखीचे बीड शहरात आगमन होण्याच्या पार्श्वभुमीवर बीड नगर परिषदेच्यावतीने शहरातील सुभाष रोडचे ‘संत मुक्ताई मार्ग’ असे नामकरण

अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा-रतन गुजर
व्यापाऱ्यांच्या प्रश्नी आ. विजयसिंह पंडित यांच्याकडून तात्काळ दखल; सुभाष रोडवरील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश
बीडच्या विकासासाठी आ.संदीप क्षीरसागर यांचा जोरदार पाठपुरावामतदारसंघातील महत्वाच्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट



संतश्रेष्ठ मुक्ताईच्या पालखीचे बीड शहरात आगमन होण्याच्या पार्श्वभुमीवर बीड नगर परिषदेच्यावतीने शहरातील सुभाष रोडचे ‘संत मुक्ताई मार्ग’ असे नामकरण करण्यात आले असून विविध संत-महंत, लोकप्रतिनिधी, व्यापारी, वारकरी, नागरीक आणि भाविकांच्या उपस्थितीत हा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. संत मुक्ताई नामकरण सोहळा हा इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदला जाईल असे गौरवोद्गार श्री क्षेत्र मुक्ताई संस्थानचे ह.भ.प. रविंद्र महाराज पाटील यांनी काढले तर संत मुक्ताईचे नाव देऊन बीड नगर परिषदेने शहरात अध्यात्माचा वसा आणि वारसा जपला असे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शिवाजीराव पंडित, श्रीक्षेत्र मुक्ताई संस्थानचे ह.भ.प. रविंद्र महाराज पाटील, आ. विजयसिंह पंडित, श्रीक्षेत्र नारायणगडचे उत्तराधिकारी संभाजी महाराज, श्रीक्षेत्र भगवानगडाचे विश्वस्त अतुल शास्त्री, ह.भ. प. विशाल महाराज खोले, श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे ह. भ. प. नवनाथ महाराज, ह. भ. प.महंत अमृत दास महाराज जोशी, ह. भ. प. अखंड आनंद गिरी महाराज, ह भ प तुकाराम महाराज भारती, ह. भ. प.हरिदास जोगदंड, ह. भ. प. विनायक महाराज पाटणकर, ह. भ. प. नाना महाराज, कदम ह भ प हरणे महाराज ह. भ. प. पंकज महाराज पाटील पत्रकार संतोष मानूरकर यांची विशेष उपस्थिती होती. शनिवार, दि.11 जुलै रोजी बीड शहरातील सुभाष रोडचे संत मुक्ताई मार्गाचे नामकरण करण्यात आले. यावेळी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ह. भ. प. रविंद्र पाटील महाराज म्हणाले की, संत मुक्ताई आणि बीडचे अतुट नाते असून त्यांचे आजोबा गोविंद पंत यांची समाधी बीड शहरात आहे. संत मुक्ताई या नावाचे नामकरण करून बीड नगर परिषदेने पुण्यकर्म केले आहे. हा नामकरण सोहळा वारकरी परंपरेचा सन्मान असून या सोहळ्याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी अमृत महाराज जोशी यांनी या नामकरण सोहळ्याचे कौतुक केले. प्रसिध्द किर्तनकार विशाल महाराज खोले यांनी शिवछत्र परिवाराचे बीड जिल्ह्यात सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. संत मुक्ताई यांच्या नावाचे नामकरण करून पंडित परिवाराने चांगले कार्य केले आहे. संतांनी दाखविलेल्या सदाचाराच्या मार्गावर समाजाने चालावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. श्रीक्षेत्र भगवानगडाचे विश्वस्थ अतुल महाराज शास्त्री यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले असे सांगत आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून होत असलेला हा कार्यक्रम आदर्श आहे. यावेळी श्री क्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शिवछत्र परिवार चार पिढ्यापासून सामाजिक, राजकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रात काम करत आहेत. आ. विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून बीड नगर परिषदेने आणि सर्व सदस्यांनी संत मुक्ताई नामकरणाचा घेतलेला निर्णय गौरवास्पद आहे. या मार्गावरून जाणार्‍या आणि या भागातून खरेदी करणार्‍या सामान्य नागरीकांनाही संतांच्या विचाराची प्रेरणा मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी संत मुक्ताई मार्ग नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत असताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, लहानपणापासून संत मुक्ताईंची पालखी या रस्त्यावरून जात असताना पाहत आलो आहोत. संत मुक्ताईंची पालखी शहरात आल्यानंतर उत्साहाचे वातावरण शहरात असते. सुभाष रोडला संत मुक्ताई मार्ग नाव देण्याचा विलक्षण आणि प्रेरणादायी योगायोग आहे. बीडला सामाजिक राजकीय, धार्मिक परंपरेचा वारसा लाभला असून तो जपण्याचा कार्य बीड नगर परिषद आणि सर्व पदाधिकारी करत आहेत. शहरातील नागरीक, व्यापारी, संत-महंतांच्या भावना लक्षात घेऊन नगर परिषदेने अध्यात्माचा वसा आणि वारसा जपला आहे. संत मुक्ताईंचे आजोबा गोविंद पंत यांची समाधीही बीड शहरात आहे, या समाधी परिसराचा नगर परिषदेच्या माध्यमातून  जिर्णोध्दार करण्याचा संकल्पही यावेळी आ. विजयसिंह पंडित यांनी केला. यावेळी पत्रकार संतोष मानूरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बळीराम गवते यांच्यासह बीड नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, उपाध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुख पटेल, सभापती शेख निजाम, सभापती बाळासाहेब गुंजाळ, सभापती संजय उढाण,  सभापती रणजीत बनसोडे, सभापती जकी सौदागर, उपसभापती शेख बिलाल, नगरसेवक महेश धांडे, प्रमोद शिंदे, मनोज गोडसे, दत्ता जाधव, रामदास सरोदे, अशपाक इनामदार, सादेक अली, जयतुला खान भैय्यासाहेब मोरे, शेख खलील, शामराव पडुळे यांच्यासह विविध संत-महंत, बीड नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, शिवछत्र परिवाराचे कार्यकर्ते तसेच बीड शहरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला हा नामकरण सोहळा बीडच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक संस्मरणीय अध्याय ठरला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माधव चाटे यांनी केले तर आभार भागवत तावरे यांनी मानले.

COMMENTS