Homeताज्या बातम्या

भारतीय संस्कृतीचा वारसा जपत ‘सत्य वृक्ष पूजन’ उपक्रम100 औषधी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) स्थापनेदिन आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त अभाविपच्या पर्यावरण गतिविधी अंतर्गत विकासार्थ विद्यार्थी (ड

पत्रकार महेश वाघमारे यांना मातृशोक
योगेश्वरीच्या महिला आत्मभान प्रशिक्षण शिबीराचा समारोप
मराठा आंदोलनातील 34 मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतशासनाचा निर्णय जारी, मनोज जरांगे यांच्या पाठपुराव्याला यश



अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) स्थापनेदिन आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त अभाविपच्या पर्यावरण गतिविधी अंतर्गत विकासार्थ विद्यार्थी (डऋऊ) यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. के. एस. के. (काकू) कृषी महाविद्यालय, बीड येथे ‘सत्य वृक्ष पूजन’ या अभिनव उपक्रमाचे गुरुवारी (9 जुलै) उत्साहात आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीतील निसर्गपूजनाची परंपरा जपत पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने वृक्षपूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी वृक्षाला जीवन, समृद्धी आणि पर्यावरणीय संतुलनाचे प्रतीक मानून श्रद्धा व कृतज्ञतेने पूजन केले. त्यानंतर महाविद्यालय परिसरात वड, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ, उंबर आणि बेल यांसह विविध प्रकारच्या 100 औषधी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरवत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्ष लावा, वृक्ष जगवा ही शपथ देण्यात आली. प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच जैवविविधतेचे महत्त्व, जलसंधारण, मृदसंधारण आणि शाश्वत कृषी पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीतही निसर्ग संवर्धनासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या पर्यावरणप्रेमींच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा सादर करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होऊन समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य साळुंके सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महेश खरे सर (सोमदरा गुरुकुल, डोमरी आश्रम), अभाविप बीड विभाग संघटक मंत्री अजय टोले, विभाग संयोजक आशिष वारे, जिज्ञासा शहर संयोजक विजय भुबरे आणि गणेश खांडगे उपस्थित होते. याशिवाय अभाविपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. भारतीय संस्कृतीतील निसर्गपूजनाची परंपरा आणि आधुनिक पर्यावरणीय गरजा यांची सांगड घालणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करत निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्यास या उपक्रमाने हातभार लावला.

COMMENTS